13/02/19 बुधवार चा परीपाठ
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
❁ दिनांक :~ 13/02/2019 ❁
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
माघ शु. ८
तिथी : शुक्ल पक्ष अष्टमी,
नक्षत्र : कृतिका,
योग : ब्रह्म, करण : बव,
सूर्योदय : 07:08, सूर्यास्त : 18:37,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
13. *ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
13. *साखरेचे खाणार त्याला देव देणार
*★ अर्थ ::~* भाग्यवान माणसाला दैवाची साथ मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
13. *भावे हि विद्यते देव: ।*
⭐अर्थ ::~ भाव तेथे देव.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक रेडिओ दिन
★हा या वर्षातील ४४ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
●१७३९ : कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
●१६६८ : स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : विनोद मेहरा – अभिनेता
◆१९११ : फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर
◆१९१० : दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित
◆१८९४ : वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार
◆१८७९ : सरोजिनी नायडू – भारतीय कोकिळा, प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
◆१८३५ : मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी
●१९७४ : ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक
●१९६८ : गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक
●१९०१ : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर –गायक नट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
13. *✸ बहु असोत सुंदर ✸*
●●●●●००००००●●●●●
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा
नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा
गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]
प्रार्थणा
*
====••◆◆●★●◆◆◆••====
13. *❂ नमने वाहुनि स्तवने ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्तीला, त्या ज्ञप्तीला, वदती वागीश्वरी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
•13. *❃ ज्ञानार्जनासाठी... ❃*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
*एका साधूला* पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले.
ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली.
राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला.
पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही.
*
❝ तात्पर्य ❞ ::~*
ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
13. साप घरावर दिसला की,
*लोक त्याला दांडक्याने मारतात,*
पण
तोच साप शिवपिंडीवर दिसला
*तर त्याला दूध पाजतात.*
*तात्पर्य - लोक सन्मान आपला नाही तर आपण ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
13. *महाराष्ट्र : थंड हवेची ठिकाणे*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
१२) नंदुरबार. ~तोरणमाळ.
१३) अहमदनगर. ~भंडारदरा
१४) कोल्हापुर~पन्हाळा, विशालगड
१५) अकोला ~नर्नाळा
१६) सिंधुदुर्ग ~अंबोली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
13. *❒श्रीमती सरोजिनी नायडू❒*
┄─┅•●●★◆★●●•┅─┄
🔹जन्म :~ १३ फेब्रुवारी १८७९
हैद्राबाद, आंध्र प्रदेश
🔸मृत्यू :~ २ मार्च १९४९
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
🔹उत्तर प्रदेशचे राज्यपाल
🔸कार्यकाळ
【इ.स. १९४७ – इ.स. १९४९】
*
सरोजिनी नायडू*
♦भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.
🔶सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्डनंतर द बर्ड ऑफ टाइम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्त्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला. *‘भारतीय कोकिळा’* म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.
♦त्यानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा {मोहंमद अली जिना] गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचारा आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले.
🔷हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना "कैसर– इ– हिंद" हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य व स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली.
No comments:
Post a Comment